प्राथमिक विभाग

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेची स्थापना जून १९८६ मध्ये करण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.वासुदेव गोसावी,सेक्रेटरी चिंतामणी जोग,विभागप्रमुख भू. ना. मगदूम  यांच्या सह सर्व पदाधिकारी वर्गाचे मार्गदर्शन होते.सुरुवातीला भिलवडी येथील राममंदिर व सार्वजनिक वाचनालय भिलवडी या इमारती मध्ये २७ पटसंख्या असणारा इयत्ता१ ली चा वर्ग भरत होता.पहिल्या शिक्षिका म्हणून सौ.अनिता भाऊसो रांजणे कार्यरत होत्या.२६ ऑगस्ट १९८७  रोजी शासनाकडून शाळेस मान्यता मिळाली.जून १९८९ ला नैसर्गिक वाढीने इयत्ता-४ थी चा वर्ग सुरू झाला.अशा पद्धतीने इयत्ता १ ली ते ४ थी चे प्रथम चार वर्ग सन १९९२-१९९३ साली १००% अनुदानित झाले.सन १९९६-९७ पासून इयत्ता-१ ली ची दुसरी तुकडी सुरू झाली.व नैसर्गिक वाढीने सन१९९९-२००० पर्यंत २ री,३ री व ४ थी ची दुसरी तुकडी सुरू झाली.या १ ली ते ४ थी च्या दुसऱ्या तुकड्या टप्पा अनुदानानुसार सन२००६-०७ या साली १००%अनुदानित झाल्या.चालू सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्राथमिक विभागातील इयत्ता १ली ते ४ थी च्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ५१९ इतकी आहे.सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक उपक्रमशील शाळा व पलूस तालुक्यातील सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा म्हणून खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी या शाळेची ओळख निर्माण झाली आहे.शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ,विभागप्रमुख, मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व पालक सातत्याने विविध उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील असतात. शाळेतील इयत्ता  ४ थी शिष्यवृत्ती परीक्षेत दरवर्षी शाळेचे विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत आपले नाव चमकवीत आहेत.भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या कै. डॉ. चंद्राताई शेणोलीकर स्मृती जिल्हास्तरीय स्पर्धेत,मनाचे श्लोक पाठांतर व कथाकथन या विभागात आपल्या शाळेतील विदयार्थी सातत्याने यश संपादन करीत आहेत. भारत स्काऊट- गाईड अंतर्गत शाळेतील कब-बुलबुल पथकाने राज्यस्तरीय परीक्षेत सुयश प्राप्त करून राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण बाण साठी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.राष्ट्रीय स्तरावरील बुलबुलच्या आनंद मेळाव्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थिनींनी महाराष्ट्राचे इगतपुरी दिल्ली या ठिकाणी नेतृत्व केले आहे.आपल्या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व शैक्षणिक विकासासाठी नवागतांचे स्वागत,वृक्षारोपण, राष्ट्रीय सणानिमित्त ध्वजवंदन,विविध सांस्कृतिक कार्यक्रम, थोर महापुरुषां च्या जयंती, पुण्यतिथी, साजरी करणे,क्षेत्रभेट,वनभोजन,दहीहंडी,दप्तराविना शाळा, वैद्यकीय तपासणी, रंगभरण स्पर्धा,हस्ताक्षर सुधार प्रकल्प,वार्षिक क्रीडास्पर्धा, बौद्धिक स्पर्धा, वार्षिक स्नेहसंमेलन,पारितोषिक वितरण, रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन,ग्रंथालय समृद्धी योजना,बालकुंज हस्तलिखित,बाह्यस्पर्शा मार्गदर्शन,जनजागृती फेरी,पालकसभा,सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक नियोजन पुस्तिकेचे वाटप असे उपक्रम दरवर्षी राबविले जात आहेत.सन२०१९-२०२० पासून प्रत्येक वर्गाच्या पालक-शिक्षक, मुख्याध्यापक व संस्था पदाधिकारी यांचा व्हाट्सप ग्रुप तयार करून त्यावरून शालेय सूचना,शैक्षणिक बातम्या,व्हिडिओ, माहिती पालकांपर्यंत पोहोचविली जाते.
  अशा प्रकारे आपल्या प्राथमिक विभागात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासा बरोबरच विद्यार्थ्यांत मैदानी खेळांची आवड निर्माण करणे,डिजिटल सोशल मीडियाचा वापर करून सर्व शालेय रेकॉर्ड ऑनलाईन व अद्ययावत करणे येत आहे.सर्व वर्गात कॉम्प्युटर, प्रोजेक्टर व स्मार्ट टी. व्ही.च्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रम,व्हिडिओ, माहिती,मनोरंजक कार्यक्रम, गाणी,कविता इत्यादी दाखविले जाते.अशा प्रकारे आपल्या प्राथमिक विभागाचे कामकाज उत्तम प्रकारे चालू आहे.गुणवत्ता व संस्कार यांचा समन्वय साधून प्राथमिक विभागाची वाटचाल सुरू आहे.आपणा सर्वांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून प्राथमिक विभागाचे कामकाज यापुढेही उत्तम करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.यासाठी आपणा सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभावे,अशी अपेक्षा व विनंती करीत आहोत.
धन्यवाद..!