Co-Curricular 
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  September 06,2019

   खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन साजरा करण्यात आला.मुख्याध्याक सुकुमार किणीकर यांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पूजा मोरे यांनी शिक्षक दिनाविषयी माहिती सांगितली.विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन सत्कार केला.विद्यार्थ्यांनी शाळा व शिक्षकांविषयी मनोगते व्यक्त केली.प्रास्ताविक सौ.प्रगती भोसले यांनी ,सूत्रसंचालन शरद जाधव यांनी,तर आभार सौ.संध्यारणी भिंगारदिवे यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.