Physical Education
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत क्रीडा महोत्सव (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

Bhilwadi  November 27,2019

  

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ झाला.सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील क्रीडा प्रशिक्षक सी. एस. पाटील यांच्या हस्ते व प्राथमिक विभागप्रमुख सौ.मनिषा पाटील यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री.सी. एस.पाटील म्हणाले की,जीवनामध्ये खेळाला महत्वपूर्ण स्थान आहे.खेळ व व्यायामामुळे शरीर व मन सदृढ व आनंदी राहते.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मनिषा पाटील यांनी विद्यार्थ्यांनी शाळेने आयोजित केलेल्या सर्व क्रीडा प्रकारात सहभागी होऊन यश प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे आवाहन करीत क्रीडा महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

    क्रीडा विभाग प्रमुख संजय पाटील यांनी प्रास्ताविक पर मनोगतात क्रीडा महोत्सवाच्या नियोजना विषयी विद्यार्थ्यांना महिती सांगितली.संध्याराणी भिंगारदिवे यांनी आभार मानले. यावेळी शरद जाधव,विठ्ठल खुटाण,वैशाली कोळी,अर्चना येसुगडे,वर्षा काटे,पूजा मोरे,सफूरा पठाण,रोहित काटकर आदी उपस्थित होते.