Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत पालक सभा संपन्न... (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

सभागृह  October 14,2019

   खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची पालकसभा सोमवार दि.१४ ऑक्टोबर २०१९ रोजी संपन्न झाली.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी.के.किणीकर,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी,शिक्षक पालक समितीचे उपाध्यक्ष सचिन पाटील,माता पालक समितीच्या उपाध्यक्षा सौ.उर्मिला चौगुले आदींसह पालक उपस्थित होते.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.पालकांच्या शंका व विविध प्रश्नांना मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी उत्तरे दिली.तसेच शाळा राबवित असलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली.परीक्षा विभागाविषयी संजय पाटील यांनी,शालेय पोषण आहाराविषयी शरद जाधव यांनी,महापूरग्रस्त मदती विषयी सौ.संध्यारणी भिंगारदिवे यांनी माहिती सांगितली. वैशाली कोळी यांनी अहवाल वाचन केले.सौ.छाया गायकवाड यांनी आभार मानले.