Special Programs
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत कोरोना बाबत जागृती कार्यक्रम.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  March 14,2020

   भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत कोरोना बाबत जनजागृती करण्यात आली.विद्यालयातील सहाय्यक शिक्षक शरद जाधव यांनी कोरोना साथीच्या प्रसारा बाबत मार्गदर्शन केले.मुलांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना घ्यावयाची काळजी,रुमालाचा वापर करावयाची पद्धत,हाताची स्वच्छता राखण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत आदी गोष्टीं ची प्रात्यक्षिकासह माहिती सांगितली.विद्यार्थ्यांकडून हात धुण्याच्या प्रात्यक्षिकाचा सराव ही करून घेण्यात आला.विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, सौ.छाया गायकवाड,संध्याराणी भिंगारदिवे,संजय पाटील,प्रगती भोसले,विठ्ठल खुटाण,अर्चना येसुगडे, वर्षा काटे,पूजा गुरव,पूजा मोरे,किरण गुरव,सफुरा पठाण,रोहित काटकर आदीं या प्रात्यक्षिकात सहभागी झाले.