Trips & Excrusions
शिक्षक वर्गाची रायगड येथे इतिहास अभ्यास सहल.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

किल्ले रायगड  March 08,2020

   खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांची रविवार दि.८ मार्च रोजी इतिहास अभ्यासाच्या दृष्टिकोनातून गडांचा राजा रायगड येथे इतिहास अभ्यास सहल काढली.भिलवडी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर व संस्थेचे संचालक संजय कदम यांनी गाडीचे पूजन करून प्रवासासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास भेट दिली.महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व महिला शिक्षकांनी राजमाता जिजाऊंच्या समाधीस अभिवादन केले.यानंतर स्वराज्याची राजधानी रायगड किल्यावर प्रवेश केला. राणी महाल,मंत्रीमंडळाची निवास्थाने,सात मनोरे,छत्रपती शिवरायांचा महाल,टांकसाळ, पाण्याचे हौद,तलाव,राजसदर,दरबार, होळीचे मैदान,बाजारपेठ, टकमक टोक,जगदीश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी,महादरवाजा, हिरकणी बुरुज,धान्याची कोठारे,विविध इमारती आदी ठिकाणी समक्ष भेटी देऊन पाहणी केली.स्थानिक गाईड च्या माध्यमातून रायगड किल्ल्याचा इतिहास व शिवकालीन वास्तुशास्त्र समजावून घेतले.या शैक्षणिक सहलीमुळे शिक्षकांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडणार असून याबाबत विद्यार्थ्यांना ही मार्गदर्शन करण्यात येत आहे.