Special Programs
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना झोपाळ्याची सोय.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी.  February 06,2020

   खाजगी मराठी प्राथमिक शाळेमध्ये दि.६ फेब्रुवारी २०२०, रोजी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी झोपाळ्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व.चंद्राताई शेणोलीकर यांच्या समाधी स्थळाच्या परिसरात सहा झोपाळे तयार करण्यात आले आहेत.प्राथमिक विभागप्रमुख प्रा. सौ.मनिषा पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुकुमार किणीकर, प्रकाश गोसावी बालवाडी च्या मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.यावेळी प्राथमिक व बालवाडी विभागाचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.या झोपाळ्याच्या वापरामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये आनंददायी असे वातावरण निर्माण झाले आहे.