Special Programs
शिक्षकांसाठी इंग्रजी विषय उदबोधन वर्ग.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी.  January 31,2020

   खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी इंग्रजी विषय उदबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी. के.किणीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.संस्थेचे आजीव सदस्य व सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथील इंग्रजी विषय शिक्षक के.डी. पाटील,मानसिंग हाके यांनी शिक्षकांना प्रशिक्षण दिले. शिक्षकांचे इंग्रजी विषयातील ज्ञान समृद्ध व्हावे,त्याचा विद्यार्थ्यांना फायदा व्हावा हा या प्रशिक्षनाचा हेतू असल्याची माहिती डी. के.किणीकर यांनी दिली. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.आभार संजय पाटील यांनी मानले.यावेळी संस्थेचे संचालक संजय कदम,प्राथमिक विभाग प्रमुख सौ.मनिषा पाटील यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.