Co-Curricular 
नैसर्गिक रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  March 13,2020

   खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शुक्रवार दि.१३ मार्च २०२० रोजी रंगपंचमी साजरी करण्यात आली.नैसर्गिक रंगाचा वापर करून रंगपंचमी कशी साजरी करायची?पाण्याचा कमीत कमी वापर करावा. सणाच्या माध्यमातून परस्परांमध्ये आपुलकी व स्नेह वाढवावा याबाबत विठ्ठल खुटाण यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या रंगांची उधळण करीत रंगपंचमी साजरी केली.