Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  February 20,2020

   ऐतिहासिक पोवाडे व भाषणांच्या सादरीकरणाने खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे छत्रपती शिवजयंती साजरी.. भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.विद्यालयातील जेष्ठ शिक्षिका सौ.छाया गायकवाड यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी इयत्ता १ ली ते ४ थी मधील विद्यार्थ्यांनी भाषणाच्या माध्यमातून शिवचरित्रातील विविध प्रसंगांचे सादरीकरण केले.मराठमोळ्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी पोवाड्यांचे सादरीकरण केले.प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले,सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख सौ.प्रगती भोसले यांनी तर सौ.अर्चना येसुगडे यांनी आभार मानले.यावेळी शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.