Special Programs
गुणवत्ता शोध परीक्षा (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  February 23,2020

   खाजगी मराठी प्राथमिक शाळेत टी.एस.ई.परीक्षा संपन्न.. भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत सांगली शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली स्पर्धा परीक्षा संपन्न झाली.भिलवडी, अंकलखोप व वसगडे या पलूस तालुक्यातील तीन केंद्रातील एकूण ३८८ विद्यार्थी या परीक्षेस उपस्थित होते.इयत्ता:-१ ली,२ री,३ री व ६ वी. साठी टी. एस. ई. तर इयत्ता ४ थी व इयत्ता ७ वी साठी शताब्दी परीक्षा घेण्यात आली.सांगली शिक्षण संस्थेचे प्रतिनिधी श्री.एस.बी.गुर्जर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुकुमार किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी परीक्षेचे कुशल व्यवस्थापन केले.