Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती बैठक. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

कार्यालय  February 26,2020

   भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शालेय उपक्रम,भौतिक सुविधा,विद्यार्थी गुणवत्ता वाढ,नवीन शैक्षणिक वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संस्था संचालक डी. के. किणीकर,संजय कदम,सचिव संजय कुलकर्णी, मानसिंग हाके,विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.सुचेता कुलकर्णी,शिक्षक प्रतिनिधी सौ.प्रगती भोसले, सौ.रामचंन्द्रे आदी उपस्थित होते.