Co-Curricular 
इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्र भेट... (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

भिलवडी.  January 24,2020

   इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची क्षेत्र भेट... भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मधील इयत्ता तिसरी व चौथीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेट या उपक्रमाअंतर्गत शुक्रवार दि.२४ जानेवारी २०२० रोजी भिलवडी परिसरातील विविध कार्यालये व उद्योगांना भेटी दिल्या.भिलवडी पोलीस ठाणे,पोस्ट ऑफिस भिलवडी,संग्राम दादा पाटील वीटभट्टी, प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी,भिलवडी ग्रापंचायत या ठिकाणी भेटी देऊन तेथील कामकाज पध्दती समजावून घेतली.मुलांनी संबंधित अधिकारी वर्ग,पदाधिकारी यांच्याशी मुलाखत रूपाने संवाद साधला.भिलवडी गावचे सरपंच विजयकुमार चोपडे,भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस निरीक्षक कैलास कोडग,पलूस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रागिणी पवार आदींनी मुलांना मार्गदर्शन केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक संजय पाटील,विठ्ठल खुटाण,सौ.प्रगती भोसले, सफुरा मगदूम, वर्षा काटे,किरण गुरव आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.