Co-Curricular 
भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेस संगणक प्रदान. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  September 19,2019

   भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेस संगणक प्रदान भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी या शाखेस नाबार्ड मधील अधिकारी वर्गांकडून एक संगणक संच प्रदान करण्यात आला. पूरग्रस्त शाळेस आवश्यक साहित्य देण्याच्या हेतूने नाबार्डचे असिस्टंट जनरल मॅनेजर लक्ष्मीकांत धानोरकर(सांगली जिल्हा),नंदू नाईक(कोल्हापूर जिल्हा),प्रदीप झिले(सोलापूर जिल्हा)यांनी शाळेस एक संगणक संच भेट दिला.भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी भेटीचा स्विकार केला.भिलवडी शिक्षण संस्थेच्या प्रकाश गोसावी बालवाडी भिलवडी मधील २७५विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी,चितळे डेअरी चे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सी.व्ही.कुलकर्णी,संजय पाटील,शरद जाधव,प्राथमिक व बालवाडी विभागाचे सर्व शिक्षक शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते.