खाजगी मराठी प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम
(खाजगी मराठी प्राथमिक शाळा) खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी. December 07,2019
|
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत क्रीडा स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम
भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी ता.पलूस येथे शालेय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
शाळेच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन पाटील व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ. उर्मिला चौगुले यांच्या हस्ते समारंभ संपन्न झाला.अध्यक्षस्थानी
भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संजय कदम होते.
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणात व बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे गुण सुप्तावस्थेत असतात,त्याला योग्य वाव मिळणे गरजेचे आहे.या हेतूनेच शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असे आहेत.
क्रीडा विभागप्रमुख संजय पाटील यांनी अहवाल वाचन केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा काटे यांनी,बक्षीस वितरण सूत्रसंचालन-संध्यारणी भिंगारदिवे यांनी तर आभार सौ.छाया गायकवाड यांनी मानले.
प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनीषा पाटील,सौ.सुचिता पाटील,नितीन गुरव,सोहन पाटील,घनश्याम पोतदार,श्रीधर मोरे,त्रिशला पाटील,सौ.राजश्री ऐतवडे,सौ.स्वाती पाटील,अभिजित वाळवेकर आदीसह पालक उपस्थित होते.
|
|