Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी.  July 13,2019

   भिलवडीतील खाजगी मराठी शाळेत वृक्षदिंडी व वृक्षारोपण भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी व   वृक्षदिंडी काढली.शाळेच्या मैदानावर साठ वृक्षांची लागवड करण्यात आली.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.पारंपारिक वेशभूषेत नटलेल्या बालवारक-यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढली. भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक यशवंतराव पाटील(राजूदादा)यांच्या हस्ते शाळेच्या मैदानावर  वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी. के. किणीकर, संजय कदम,मानसिंग हाके,मुख्यध्यापक सुकुमार किणीकर, सौ.छाया गायकवाड,संजय पाटील, आदींसह सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक शरद जाधव यांनी, सूत्रसंचालन प्रगती भोसले यांनी तर संध्याराणी भिंगारदिवे यांनी आभार मानले.