Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी.  June 21,2019

   भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला.मानवी जीवनात योगाचे स्थान महत्वपूर्ण असे आहे.आपले आरोग्य निरोगी व निरामय करण्यासाठी प्राणायम व योगाशी विद्यार्थी जीवनातच मैत्री करावी असे प्रतिपादन योगगुरू सौ.अनिता पाटील (सांगली)यांनी केले.योगगुरू सौ.अनिता पाटील,व सौ.दीपाली मोरे यांनी विविध प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व राष्ट्रपती पुरस्कार विजेते क्रीडा प्रशिक्षक डी. के. किणीकर सर यांच्या उपस्थितीत योगदिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी,सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार वर्षा काटे यांनी मानले.यावेळी सौ.छाया गायकवाड,प्रगती भोसले, संध्याराणी भिंगारदिवे,विठ्ठल खुटाण,शरद जाधव,सफुरा पठाण,अर्चना येसूगडे,पूजा मोरे,पूजा गुरव आदींसह सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.