Co-Curricular 
महिला दिन साजरा.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  March 09,2020

   भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेत सोमवार दि.९ रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जेष्ठ शिक्षिका सौ.छाया गायकवाड यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.शिक्षिका सौ.पूजा गुरव यांनी मार्गदर्शन केले.कु.अवनी नितीन गुरव इयत्ता २ री.या विद्यार्थिनींने मनोगत व्यक्त केले.शाळेच्या वतीने सर्व महिला शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक सुकुमार किणीकर,भिलवडी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य मानसिंग हाके,संजय पाटील आदींसह शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.प्रास्ताविक संध्यारणी भिंगारदिवे यांनी केले,सूत्रसंचालन प्रगती भोसले यांनी तर वर्षा काटे यांनी आभार मानले.