Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी  January 26,2020

   भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळेमध्ये रविवार दि.२६ जानेवारी २०२० रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी पूजा मोरे यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका चे वाचन केले.भिलवडी येथे संस्थेचे संचालक डी.के. किणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.उपाध्यक्ष डॉ.बाळासाहेब चोपडे,विश्वस्त जे. बी.चौगुले,संस्थेचे संचालक प्रा.आर.डी. पाटील,व्यंकोजी जाधव, दादासाहेब चौगुले,डॉ.सुनिल वाळवेकर,प्रा.धनंजय पाटील,जयंत केळकर,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी,मानसिंग हाके,के.डी. पाटील,प्रा. सौ. मनिषा पाटील,प्राचार्य डॉ. श्रीकांत चव्हाण, मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, सौ.विद्या टोणपे,सौ.स्मिता माने,सौ. सुचेता कुलकर्णी आदींसह मान्यवर,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.संजय पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांनी समूहगीते,देशभक्तीपर नृत्ये सादर केली.