Special Programs
पहिली मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी.. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी.  August 02,2019

   खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.माऊली क्लिनिक लॅबोरेटरी भिलवडीचे डॉ.सचिन आंबी यांनी विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासले. विद्यालयाचे मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, वर्गशिक्षिका सौ.छाया गायकवाड, सौ.संध्याराणी भिंगारदिवे, कु.पूजा मोरे आदींनी संयोजन केले.रक्तगट तपासून त्याबाबतची माहिती पालकांना कळविण्यात येते.प्रतिवर्षी इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात येते.