Co-Curricular 
खाजगी मराठी प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत व मोफत पाठयपुस्तक वितरण कार्यक्रम. (खाजगी मराठी प्राथमिक शाळा)

सभागृह  June 17,2019

   भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी या शाळेत पहिल्याच दिवशी नवागतांचे स्वागत व मोफत पाठयपुस्तक वितरण कार्यक्रम संपन्न झाला.भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व राष्ट्रपती पदक प्राप्त माजी मुख्याध्यापक डी.के.किणीकर सर यांच्या प्रमुख उपस्थितींमध्ये व संस्थेचे संचालक व्यंकोजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.विदयार्थी मित्रांनो शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिस्तप्रिय बना, वेळेचे महत्व ओळखून अभ्यासाला लागा असे आवाहन प्रमुख पाहुणे डी.के.किणीकर यांनी केले.प्रारंभी सरस्वती व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.इयत्ता १ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.सौ.पठाण यांनी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माहिती सांगितली.प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी सूत्रसंचालन संजय पाटील यांनी तर आभार छाया गायकवाड यांनी मानले.यावेळी सर्व शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.